मागे न हटणाऱ्या इंदुताई
कुंदा प्रमिला नीळकंठ
०६ सप्टेंबर २०२०
कॉम्रेड इंदुताईंची आठवण आली की, चल गं हिरा चल गं मीरा चल गं बायजाबाई मागं काही नाही आता तटून उभी राही असं ३०-४० बायकांसमोर खड्या आवाजात गाणं म्हणतानाचा त्यांचा दमदार-पुरुषी आवाज आजही माझ्या कानात घुमतो. स्त्रियांच्या चळवळीची गाणी आणि इंदुताईंचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. १९८४ ते ८८ या काळात विटा, खानापूर, तासगाव, वाळवा तालुक्यातील गावात आम्ही फिरत असताना संघटना उभारणीच्या काळात ‘स्…